आमच्याविषयी

पुणे वाणी.कॉम ही वेबसाईट पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील लाडशाखीय वाणी समाज बांधवांच्या वास्तव्याविषयक माहिती उपलब्धतेसाठी बनवली आहे. वास्तव्यदर्शिका २०११-१२ च्या आवृत्तीतील सर्व नावे व पत्ते यात समाविष्ट केलेले आहेत. या वेबसाईटवर असणारे पत्ते आपण प्रिंट काढून आपल्या उपयोगासाठी वापरु शकतात. आपले पत्त्यातील व दूरध्वनीतील बदल आम्हास ई-मेल किंवा पत्राद्वारे कळविल्यास ते सर्वबदल या वेबसाईटवर शक्यतेवढे लवकर करण्याचा मानस आहे. आपले वा आपल्या आप्तेष्टांचे नाव व पत्ता नव्याने समाविष्ट करावयाचा असल्यास ई-मेलने वा पत्राद्वरे कळविल्यास त्याचीही समाविष्टता केली जाईल. जेणेकरुन इतर समाजबांधवांना आपणाशी संपर्क साधता येईल.

भविष्यात ही वेबसाईट नुसतीच पत्यांकरिता न मर्यादित ठेवता समाजविकासासाठी असणाऱ्या विविध उपक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणूनही उपयोग होऊ शकेल.

या वेबसाईटची निर्मिती व देखभाल शेंडे सेल्स कॉर्पोरेशन, ४७०, सदाशिव पेठ, टिळक रोड, न्यू इंग्लिश शाळेसमोरील गल्ली, पुणे ४११ ०३०. फोन : ०२०-२४४८८००५, २४४७९००५, २४४९७०९८, ६६०२०११९, ३२३४४५७५ फॅक्स नं.: ६६०२०८५१. यांनी समाजाशी बांधीलकी म्हणून केली आहे. शेंडे सेल्स कॉर्पोरेशन ही व्यापारी संस्था पोराळा येथील प्रतिथयश व्यापारी श्री. बंडूनाना सदाशिव वाणी, जवाहर रोड, पारोळा ४२५ १११, जि. जळगाव. फोन : ०२५९७-२२२६७१ यांचे सुपुत्र श्री. प्रशांत बंडु वाणी, श्री. अभिजीत बंडू शेंडे व श्री. सचिन बंडू शेंडे यांचे द्वारा प्रवर्तित व संचलित व्यापारी संस्था आहे. या व्यापारी संस्थेची सुरुवात १९८८ साली सुरु होऊन २००२ साली पूजा फ्लुईड सिल्स प्रा. लि. ही सहयोगी उत्पादन संस्था अस्तित्वात आली. या दोन्ही व्यापारी संस्था औद्योगिक व्यापारासाठी लागणाऱ्या रबर उत्पादने जसे ऑईल सिल्स, ओ रिंग्ज निर्मिती व वितरणात भारतभर नाव लौकिक मिळविलेल्या संस्था आहेत.

श्री. प्रशांत बंडू वाणी यांना समाजकार्याची आवड असल्याने सन १९९६ सालापासून समाजाच्या तीन वास्तव्यदर्शिका स्वखर्चाने प्रकाशित व वितरीत केल्या आहेत. सन २००२ पासून समाजाचे पुणे शहरातील प्रथम संघटीत व नोंदणीकृत मंडळ उत्कर्ष मित्र मंडळ तर्फे पुढील तीन आवृत्ती प्रकाशित केल्या आहेत.

या वेबसाईटविषयी आपल्या सूचना व अभिप्रायांचे स्वागतच केले जाईल.

आपला कृपाभिलाषी
श्री. प्रशांत बंडू वाणी
९८२२० १२६५४